गरिबी

होय मी गरिबी अनुभवली आहे अगदी जवळून 
10वी पर्यंतच शिक्षण आजोळी (खुपिरे)येथे पूर्ण केल .पुढच्या शिक्षणाला मात्र बाहेर पडावच लागणार होते.11वी व 12वी साठी यवलूजमधील संजयसिंह गायकवाड कॉलेज ला प्रवेश घेतला व माझ रूटीन सुरु झाल.माझ मूळ गाव यवलूज पण माझी आजी म्हणजे मामाची आई आजारी असल्या कारणाने मी तिकडच (खुपिरे)राहिले होते .रोज सकाळी 7च्या के एमटी बस ने प्रवास करायची त्यासाठी महिन्याचा पास काढत होते.त्यावेळी म्हणजे 2007ला तिकीट5रु होते व   महिन्याचा पास 125रु ला मिळायचा.माझा पास संपला की मी 2-3कॉलेज ला जात नव्हते .बहुतेक हे त्या बसला नेहमी असणार्या ड्रायव्हर मामानी ओळखल होत आणि त्यानी मला तस एकदा विचारल मग मी सांगितले की घरी आजी आजारी असते मामा लहान शेतीवर घर चालायच सारख पैसे मागणार कुणाकडे म्हणुन काय होतय 2दिवस नाही गेले तर त्यानी त्यावेळी मला जाधव मामा (ड्रायव्हर)यानी सांगितल की पास संपला तरी तू त्या दिवशी कॉलेज ला जायचस तिकिटासाठी लागणारे 5रु मला ते देत होते.आणि कधी कधी कंडक्टर मामा ना सांगायचे या पोरगीच तिकिट घेऊ नका.मग पास संपला की 2-3दिवस कॉलेजला जायची व्यवस्था तर व्हायची पण येताना मात्र तिच बस नसायची त्यामुळ मला आणखी एक व्यक्ती मदत करायची ती म्हणजे आमचे हायस्कूल चे शिपाई मामा यवलूज मधून ते सकाळी 10.30ला खुपिरे येथे जायचे .आणि म्हणुन पास संपला की मी एक लेक्चर चुकवायचे कारण मला 5रु वाचवायचे होते.त्यामुळ गरीब असण्याची थोडी तरी झळ त्यावेळी मला बसली होती म्हणुन मी गरिबी जवळून अनुभवली आहे.
असे बरेच अनुभव मी या लॉकडाउनच्या काळात लिहुन काढत आहे.भविष्यात एखाद पुस्तकही तयार होइल आपल मार्गदर्शन व प्रतिक्रिया यांचीच अपेक्षा आहे

Comments