Posts

गरिबी

होय मी गरिबी अनुभवली आहे अगदी जवळून  10वी पर्यंतच शिक्षण आजोळी (खुपिरे)येथे पूर्ण केल .पुढच्या शिक्षणाला मात्र बाहेर पडावच लागणार होते.11वी व 12वी साठी यवलूजमधील संजयसिंह गायकवाड कॉलेज ला प्रवेश घेतला व माझ रूटीन सुरु झाल.माझ मूळ गाव यवलूज पण माझी आजी म्हणजे मामाची आई आजारी असल्या कारणाने मी तिकडच (खुपिरे)राहिले होते .रोज सकाळी 7च्या के एमटी बस ने प्रवास करायची त्यासाठी महिन्याचा पास काढत होते.त्यावेळी म्हणजे 2007ला तिकीट5रु होते व   महिन्याचा पास 125रु ला मिळायचा.माझा पास संपला की मी 2-3कॉलेज ला जात नव्हते .बहुतेक हे त्या बसला नेहमी असणार्या ड्रायव्हर मामानी ओळखल होत आणि त्यानी मला तस एकदा विचारल मग मी सांगितले की घरी आजी आजारी असते मामा लहान शेतीवर घर चालायच सारख पैसे मागणार कुणाकडे म्हणुन काय होतय 2दिवस नाही गेले तर त्यानी त्यावेळी मला जाधव मामा (ड्रायव्हर)यानी सांगितल की पास संपला तरी तू त्या दिवशी कॉलेज ला जायचस तिकिटासाठी लागणारे 5रु मला ते देत होते.आणि कधी कधी कंडक्टर मामा ना सांगायचे या पोरगीच तिकिट घेऊ नका.मग पास संपला की 2-3दिवस कॉलेजला जायची व्यवस्था तर व्हायची...

आदर्श व्यक्तिमत्त्वाची सेवानिवृत्ती

_***आदर्श व्यक्तिमत्त्वाची सेवानिवृत्ती*  आदरणीय प्रा.पुष्पा श्रीकांत कुन्ने(मातोश्री)31मे 2020रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.शिक्षण क्षेत्रातील एक प्रामाणिक व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहते.2010ला ज्युनियर कॉलेज ऑफ  एज्युकेशन पेटाळा येथे डी एड ला  addmisson घेतल तेव्हा पासूनची आमची ओळख  म्हणण्यापेक्षा मैत्री.त्यांच्या विषयी लिहण्यासाठी खरतर शब्द अपुरे पडतील .'आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा 'हे ब्रीदवाक्य प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात रुजवून आपला विद्यार्थी यशस्वी झालाच पाहिजे असा त्यांचा अट्टहास.एक आदर्श शिक्षक ते आईप्रमाणे मला माया लावणार्या मातोश्री कॉलेजमधून सेवानिवृत्त होत असल्यातरी माझ्या मनातून कधी होणार नाहीत.मला त्यांच्याकडून मिळालेली शिकवण,संस्कारांची शिदोरी न संपणारी आहे.त्यांची अध्यापन करण्याची शैली प्रत्येक विद्यार्थी मनाला भारावून टाकणारी आहे.त्यांच्या अध्यापनातून वक्तशीरपणा,शिस्तप्रियता,समंजसपणा हे गुण आमच्या अंगी रुजले.    मातोश्री सेवानिवृत होणार म्हणून आम्ही कार्यक्रमची तयारी करुन मा.सिंधुताईना प्रमुख पाहुणे ...

बैलपोळा सण

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे.बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.[नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा. हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो.पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कव...