आदर्श व्यक्तिमत्त्वाची सेवानिवृत्ती
_***आदर्श व्यक्तिमत्त्वाची सेवानिवृत्ती*
आदरणीय प्रा.पुष्पा श्रीकांत कुन्ने(मातोश्री)31मे 2020रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.शिक्षण क्षेत्रातील एक प्रामाणिक व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहते.2010ला ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन पेटाळा येथे डी एड ला addmisson घेतल तेव्हा पासूनची आमची ओळख म्हणण्यापेक्षा मैत्री.त्यांच्या विषयी लिहण्यासाठी खरतर शब्द अपुरे पडतील .'आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा 'हे ब्रीदवाक्य प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात रुजवून आपला विद्यार्थी यशस्वी झालाच पाहिजे असा त्यांचा अट्टहास.एक आदर्श शिक्षक ते आईप्रमाणे मला माया लावणार्या मातोश्री कॉलेजमधून सेवानिवृत्त होत असल्यातरी माझ्या मनातून कधी होणार नाहीत.मला त्यांच्याकडून मिळालेली शिकवण,संस्कारांची शिदोरी न संपणारी आहे.त्यांची अध्यापन करण्याची शैली प्रत्येक विद्यार्थी मनाला भारावून टाकणारी आहे.त्यांच्या अध्यापनातून वक्तशीरपणा,शिस्तप्रियता,समंजसपणा हे गुण आमच्या अंगी रुजले.
मातोश्री सेवानिवृत होणार म्हणून आम्ही कार्यक्रमची तयारी करुन मा.सिंधुताईना प्रमुख पाहुणे म्हणुन बोलवणार होतो.कारण सिंधूताई जशा अनाथांची माय म्हणून काम करतात तस आपल्या विद्यार्थ्याना प्रत्येक वेळी मदत मातोश्री करतात.म्हणुन गुरुदक्षिणा म्हणून माईंच्या लेकराना मदत आम्ही सगळे मिळून करणार होतो. पण कोरोनच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे कार्यक्रम फक्त कॉलेजमधील शिक्षकांच्या उपस्थित पार पडणार आहे.आम्ही जी वर्गणी जमा केली होती त्यातुन PM care fund,CM care fund,उमेद फाऊंडेशन,शैक्षणिक व्यासपीठ शाहूवाडी यांना मदत करुन आमची गुरुदक्षिणा दिली.शेवटी एवढच वाटत
आपण सेवानिवृत होताय,पण आपल्याशी असलेल नात अबाधितच राहील,तुमच्या सहवासात घालवलेले अनेक क्षण आजही आम्हाला आठवतात...
तुमचा स्वभाव,तुमच वागण आठवतच राहील.तुमच इथून पुढच आयुष्यही असच सुखसमाधानाचं जावो ही प्रार्थना
काही व्यक्ती ..
सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या असतात ...
त्या तुमच्या जवळ असोत किंवा नाही
त्यांच्या आठवणींचा सुगंध
सदैव तुमच्या आयुष्यात
दरवळत राहतो....
तुमची लाडकी मुलगी
सौ .अश्विनी प्रविण पाटील
मु .पो.वाघवे,ता.पन्हाळा**_
Comments
Post a Comment